झिरो टॉलरन्स ठेवला पाहिजे ; राहुल गांधींनी दिली पीएफआय छाप्यांवर प्रतिक्रिया

0
62

देशातील विविध ठिकाणी फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयांवर राष्ट्रीय तपास एजन्सीकडून छापेमारी करण्यात आली आहे. तसेच शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केरळमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्व प्रकारचा जातीयवाद आणि हिंसाचार मग तो कुठूनही आलेला असेल हे सर्व एकसारखेच आहेत, त्यामुळं त्याचा सामना केला पाहिजे. यासाठी झिरो टॉलरन्स ठेवला पाहिजे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पीएफआयच्या कार्यालयांवरील छाप्यांबाबत भाष्य केलं पाहिजे.

दरम्यान, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचे पुरावे समोर आल्यानं पीएफआय या संघटनेच्या केरळ, तामिळनाडू, कर्नाटकसह १० राज्यांमधील कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या संघटनेच्या कार्यालयांवर छापेमारी झाली. यामध्ये संघटनेच्या शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांना एनआयएनं ताब्यात घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here