मराठी कलाकार लतादीदींच्या अंत्यदर्शनला का नव्हते ; अभिनेत्री हेमांगी कवीने दिले उत्तर

0
234

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. काल लतादीदींच्या अंत्यसंस्काराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक बड्याबड्या लोकांनी हजेरी लावली होती. मात्र, त्या सगळ्या मान्यवरांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील एकही कलाकार उपस्थित नव्हते असं का? असा प्रश्न करणाऱ्या नेटकऱ्यांना मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने सडेतोड उत्तर दिले आहे.

नक्की काय म्हणाली आहे हेमांगी कवी ?

“सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून आत जाऊ दिलं नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप, मी आणि अभिजीत केळकर ४ वाजल्यापासून तिथं होतो. शेवट पर्यंत आम्हांला विनंती करून ही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकलं जात होतं, तिथं माझी काय गत!”

“आम्ही तिथे कुणी सेलिब्रीटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हांला ही शासकीय प्रोटोकॉल्स कळत होते, म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here