TIFF मध्ये रविश कुमारांवरील ‘डॉक्युमेंट्री’ला पुरस्कार

0
45

टोरँटो फिल्म महोत्सवामध्ये व्हाईल वी वॉच या माहितीपटावर पुरस्काराची मोहोर उमटली आहे. या महोत्सवामध्ये प्रेक्षकांचा या माहितीपटाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये माहितीपटाला गौरविण्यात आले आहे. यावेळी निशा पाहुजा यांच्या टू किल अ किल आणि मत्रिका रामीरिझ यांच्या इस्कोबार लिओनारी विल बी डायलाही पुरस्कार देण्यात आला आहे. व्हाईल वी वॉचच्या वतीनं चर्चेतील न्युज ड्रामा क्रिएट करण्यात आला होता त्याचे नाव होते त्यात प्रसिद्ध पत्रकार रविश कुमार यांनी सद्यस्थितीतील काही धक्कादायक सत्य मांडण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून रविश कुमारांवरील माहितीपटाची चर्चा होती. त्यात त्यांनी मांडलेल्या काही तथ्यांबदल वादही झाला होता. पत्रकार म्हणून त्यांची वाटचाल, त्यांचा संघर्ष याला प्रभावीपणे माहितीपटात सादर करण्यात आले आहे. या माहितीपटाचे स्क्रिनिंग टीआयटी महोत्सवात झाल्यानंतर त्याला प्रेक्षक, समीक्षक यांच्याकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विनय शुक्ला यांनी या माहितीपटाची निर्मिती केली असून त्याला जगभरातून जाणकारांनी गौरविले आहे.

यापूर्वी विनय शुक्ला यांनी अॅन इनसिग्निफिकंट मॅन, द राईज ऑफ दिल्ली चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल यांच्यावर एका चित्रपटाची निर्मिती केली होती. 2016 साली तयार केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यालाही जगभरातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. रविश कुमारांवरील माहितीपटाचा गौरव झाल्यानंतर त्याविषयी प्रतिक्रिया देताना शुक्ला म्हणाले, हा माहितीपट तयार करणे हा माझ्यासाठी वेगळा अनुभव होता.

सद्यस्थितीतील वास्तव मांडण्याचे धाडस रविश कुमार यांनी दाखवले आहे. त्याची किंमतही त्यांनी मोजली आहे. अशा पत्रकाराच्या संघर्षाचा प्रवास लोकांपुढे मांडावा असे वाटले. रविश यांच्यावरील माहितीपटासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. त्यासाठी त्यांचे डेलि ब्रॉडकास्ट अभ्यासावे लागले. खूप तयारी करावी लागली. तो अनुभव खूप काही शिकवून गेला. त्यांनी केलेले वार्तांकन हे खूप अभ्यासू, भावनिक आणि वास्तवदर्शी होते. अशी प्रतिक्रिया शुक्ला यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here