सचिन तेंडुलकर यांचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा व्हिडीओ चर्चेत

0
69

सध्या भारताचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी लेजंड लीग क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. इंडिया लेजंड संघाचे ते नेतृत्व देखील करत आहे. सचिन यांना पुन्हा एकदा पॅड घालून, बॅट हातात घेऊन फलंदाजी करताना पाहणे ही चाहत्यांसाठी परवणीच असते. त्यामुळेच सचिनचे लेजंड लीगमध्ये खेळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. मात्र आता सचिन तेंडुलकर यांचा एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडीओ ?

सचिन तेंडुलकर यांना कुकिंगची देखील आवड आहे. असाच एक कुकिंगचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सचिन तेंडुलकर लेजंड लीगदरम्यान बॅटिंग करण्यासाठी पॅड घालून तयार झाले होते . मात्र या व्हिडिओत सचिन तेंडुलकर पॅड घालून बॅटिंग नाही तर कुकिंग करताना दिसून येत आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने ‘फ्लिक असो वा फ्लिप ऑमलेट कायम परफेक्टच असलं पाहिजे.’ असे कॅप्शन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here