‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून स्वप्निल जोशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

0
305

झी मराठी वाहिनीवर ‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून स्वप्निल जोशी अनेक दिवसांनी मालिका विश्वात पदार्पण करणार आहे. प्रेक्षकांना स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. स्वप्निलचा स्वतः चा असा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर स्वप्निलला पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. शिल्पा तुळसकर यांच्या वास्तववादी आणि सहजसुंदर अभिनयाचे ही अनेक चाहाते आहेत.

स्वप्निलने एकापेक्षा एक असे हिट मराठी सिनेमे दिले आहेत. याशिवाय सध्या तो चला हवा येऊ द्या च्या परिवाराचाही भाग झाला आहे. वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सर्व माध्यमात त्याने काम केलं आहे. त्यामुळे या चॉकलेट बॉयला ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेच्या माध्यमातून पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here