बंडानंतर शिंदे गटाची पहिली निवडणूक ; शिंदे गटाला म्हणावं तसं यश मिळालं का ?

0
91

शिवसेनेत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट निर्माण झाले असून पहिल्यांदाच हे दोन्ही गट राजकीय मैदानात लढण्यास उतरले . कारण होते ग्रामपंचायत निवडणुकीचे .. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारताना आम्हाला महाविकास आघाडी मान्य नाही असे सातत्याने सांगितले . . तसेच, महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचे नुकसान होत असल्याचा दावा देखील केला. हाती आलेल्या निकालानुसार, भाजप + शिंदे गट यांना पक्षनिहाय मते बघता यश मिळाले असे म्हंटले जात आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरंच यश मिळालं का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आत्ता मिळालेल्या मतांनुसार , जिल्ह्यातील सर्वात मोठी सातारा शहराजवळच्या खेड ग्रामपंचायतीत शिंदे गटाने सत्तांतर घडवले. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे यांच्या गटाने १२/५ अशा फरकाने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले. गोजेगाव ग्रामपंचायतीवर देखील शिंदे गटाने भगवा फडकवला आहे. आमदार महेश शिंदेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दोन ग्रामपंचायती मिळाल्या पण शिवसेनेत बंद केला नसता तर याहून अधिक यश मिळाल असता का असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे हे यश म्हणायचे की अपयश अशा चर्चांना उधाण आलं आहे.

याचबरोबर, अनेक ठिकाणी शिंदे गट गड राखू शकला नाही . तसेच, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस देखील तेवढ्याच बरोबरीने उभी राहिलेली दिसून अली भाजप + शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे गणित बघता महाविकास आघाडीकडे झुकते माप असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत राहिल्यानंतर याहून अधिक जागा शिंदे गटाने मिळवल्या असत्या का याचा विचार करणे गरजेचे आहे.

तसेच, एकूण लोकांचा कौल बघता महाविकास आघाडीवरून लोकांचा विश्वास उडाला आहे किंवा फक्त भाजप + शिंदे गटचं लोकांना पाहिजे असे काही निकालातून समोर आलेले नाही. यामुळे , शिंदे गटाला म्हणावं तसं यश मिळालं का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here