पायांच्या तळव्यावरून कळतो व्यक्तिचा स्वभाव अन् भविष्य; सपाट तळवे असणारे लोक….

0
75

ज्योतिष शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांची स्थिती पाहून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कळते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराची रचना आणि शरीरावरील खुणावरून, त्याचे भविष्य आणि गुण तसेच स्वभाव जाणून घेता येतो. आज आपण पायाच्या तळव्यांबद्दल बोलणार आहोत. पायांच्या तळव्यांवरून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते.

ज्या लोकांचे पायाचे तळवे अतिशय मऊ, गुळगुळीत आणि लाल रंगाचे असतात. असे लोक खूप भाग्यवान मानले जातात. या लोकांना पैशाची कमतरता नसते. हे लोक श्रीमंत असतात आणि त्यांना प्रवास करायला आवडतं. हे लोक थोडे विनोदी स्वभावाचेही असतात.

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचे तळवे सपाट असतात. असे लोक मेहनतीच्या जोरावर यश मिळवतात. तसेच ते मनमोकळे असतात. असे लोक स्पष्टवक्ते असतात, त्यांना जे काही बोलायचं असेल ते तोंडावर बोलतात.

सामुद्रिक शास्त्रानुसार पायांच्या टाचांना भेगा असतील तर ते शुभ मानले जात नाही. अशा लोकांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण हे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात. हे लोक त्यांच्या मनाचे मालक असतात. तसेच, हे लोक नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here