पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; महाराष्ट्र, मेघालय वगळता देशभरात 102 दिवसांपासून किमती स्थिर

0
51

तब्बल दोन वर्षांनी राज्यासह देशभरात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज घराघरात लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. अशातच सणासुदीच्या काळातही सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. महागाईनं कळस गाठलाय, अशातच भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol Price) -डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) कोणतीही वाढ अथवा घट करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. मंगळवारी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली व्यवहार करत आहे. तर, ब्रेंट क्रूड तेल सोमवारी 0.3 टक्क्यांनी घसरून USD 104.70 प्रति बॅरलवर आलं आहे. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्चे तेल सोमवारी 0.2 टक्क्यांनी घसरून 96.79 डॉलर प्रति बॅरलवर आलं.

मेघालय आणि महाराष्ट्र वगळता राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये सलग 102 दिवस कोणताही बदल झालेला नाही. मोदी सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. तर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here