ग्राहकांनो लक्ष द्या ! ‘या’ बँकेला दोन दिवसांनी लागणार टाळं; लवकर पैसे काढून घ्या

0
105

ग्राहकांनो लक्ष द्या एका को-ऑपरेटिव्ह बँकेला टाळं लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पुण्यातील रुपी सहकारी बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. २२ सप्टेंबरपासून या बँकेच्या सर्व सेवा बंद होतील. त्यामुळे आरबीआयनं ग्राहकांनी त्यांचे पैसे बँकेतून काढावेत, अशी सूचना केली आहे. ग्राहकांना त्यांच्या खात्यातून २२ सप्टेंबरनंतर पैसे काढता येणार नाहीत.

आरबीआयनं पुणेस्थित रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक २२ सप्टेंबरपासून आपले व्यवहार बंद करेल. त्यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेच्या ग्राहकांकडे केवळ २ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यानंतर ग्राहकांना त्यांचे पैसे खात्यातून काढता येणार नाहीत. रुपी बँकेची आर्थिक स्थिती अतिशय वाईट असल्यानं आरबीआयनं बँकेनं त्यांचा परवाना रद्द केला.

का करण्यात अली आहे बँकेवर कारवाई ?

रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेनं आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे बँकेवर कारवाई करण्यात आली. बँकेकडे पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्यानं आणि उत्पन्नाची शक्यता नसल्यानं आरबीआयकडून कारवाई करण्यात आली. याची माहिती आरबीआयनं ऑगस्टमध्ये ग्राहकांना दिली. १० ऑगस्टला यासंदर्भात एक प्रेस रिलीज प्रसिद्ध करण्यात आलं. रुपी सहकारी बँकेचा परवाना ६ आठवड्यांनंतर रद्द करण्यात येईल. त्यानंतर बँकेच्या सगळ्या शाखा बंद होतील आणि ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत, असा आदेश आरबीआयनं काढला होता. आरबीआयनं आदेशात नमूद केलेला ६ आठवड्यांचा कालावधी २२ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरनंतर बँकेचं कामकाज बंद होईल.

ग्राहकांना भरपाई मिळणार का ?

रुपी सहकारी बँकेच्या ग्राहकांना पाच लाखांपर्यंतच्या रकमेसाठी विम्याचा लाभ मिळेल. डिपॉझिट अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशनकडून (डीआयसीजीसी) हा विमा मिळत आहे. डीआयसीजीसी आरबीआयची सब्सिडरी आहे. ग्राहकाची ५ लाखांपर्यंत रक्कम रुपी बँकेत असल्यास त्याला पूर्ण क्लेम मिळेल. मात्र ५ लाखांपेक्षा अधिक रक्कम खात्यात असल्यास ग्राहकाला पूर्ण रक्कम मिळणार नाही. त्याला केवळ ५ लाख इतकीच भरपाई मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here