26 सप्टेंबरपासून सुरु होणार नवरात्रोत्सव ; जाणून घ्या यंदाच्या नऊ रंगांबद्दल

0
117

यंदा 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा देवीचे वाहन हत्ती असणार आहे. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदाच्या नऊ रंगांबद्दल जाणून घेऊया.

नवरात्रीचे नऊ रंग

पहिला दिवस-  सोमवार 26 सप्टेंबर 2022 , रंग – पांढरा रंग, हा रंग शांततेचे प्रतीक आहे.
 दुसरा दिवस – मंगळवार 27 सप्टेंबर 2022  लाल रंग, हा रंग पवित्रतेचे प्रतीक आहे.
तिसरा दिवस-  बुधवार 28 सप्टेंबर 2022  निळा रंग, हा रंग साहस आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
चौथा दिवस- 29 सप्टेंबर 2022  पिवळा रंग. हा रंग स्नेहाचे प्रतीक आहे.
पाचवा दिवस- ३० सप्टेंबर 2022 हिरवा रंग.  हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे.
सहावा दिवस – 1 ऑक्टोबर 2022 करडा रंग. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे.
सातवा दिवस-  2 ऑक्टोबर 2022 नारिंगी रंग. हा रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.
आठवा दिवस-  3 ऑक्टोबर 2022 मोरपंखी रंग. हा रंग  समृद्धी, नाविण्यता, ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 गुलाबी रंग.  हा रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here