जाणून घ्या काँग्रेस अध्यक्षाची निवड कशी होते

0
63

सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते एकाच प्रश्नाकडे की काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोण घेणार .काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे जाणार या प्रश्नाचं उत्तर अखेर येत्या १९ ऑक्टोबरपर्यंत मिळेल हे आता स्पष्ट आहे. पण काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून गदारोळ सुरू आहे . आतापर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर भारतीय जनता पार्टीकडूनच प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु यावेळेस काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडूनही आवाज उठवला जात आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा बनल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांचा हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, नवा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत त्याचं अध्यक्षा राहणार आहेत. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कसा निवडला जातो आणि त्याची प्रक्रिया काय आहे, हे आपण पाहुया…

कशी होते काँग्रेस अध्यक्षाची निवड ?

काँग्रेस पक्षाच्या संविधानात अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सविस्तरपणे दिली आहे.

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणजे काँग्रेसची वर्किंग कमेटी (सीडब्ल्यूसी) congress working committee अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करते.

त्यानंतर पक्षाचे कोणतेही 10 प्रतिनिधी संयुक्तपणे अध्यक्षपदासाठी एकाच्या नावाचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवतात.

पक्षाच्या संविधानाच्या अनुच्छेद 12 नुसार, प्रदेश काँग्रेस कमेटीचे सर्व सदस्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असतात. सर्वसामान्य निवडणुकीप्रमाणे, काँग्रेसमध्येही नामाकंन भरल्यानंतर ते परत घेण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला जातो.

तर, अध्यक्षपदासाठी एकच उमेदवार असल्यास त्याला काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून घोषित केलं जातं.

काँग्रेसच्या पूर्ण अधिवेशनात पक्षाचा नवा अध्यक्ष कार्यभार ग्रहण करतो. काँग्रेस अध्यक्षाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. त्यानंतर पुन्हा निवड केली जाते.

अध्यक्षपदासाठी अनेक उमेदवार उभे असल्यास, विजेत्या उमेदवाराला कमीतकमी 50 टक्के मतं मिळणे आवश्यक असते. काँग्रेस वर्किंग कमेटीजवळ हंगामी अध्यक्ष निवडण्याचेही अधिकार असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here