‘मुन्नाभाई’चं काळीज कळायला सात जन्म घ्यावे लागतील – मनसे

0
71

गोरेगावच्या नेस्को मैदानावर झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ‘मुन्नाभाई’ संबोधत डिवचले होते. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने प्रतिउत्तर देत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटासोबत ‘मुन्नाभाई’ आपल्यावर हल्ला करणार आहेत. त्यामुळे ही लढाई किती अटीतटीची होईल, हे लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. .या टीकेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

गजानन काळे यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘मामू’ असा केला आहे. आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईच काळीज कळायला ‘मामू’ला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू, असे गजानन काळे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here