गांधींशिवाय काँग्रेस शक्य आहे का ?

0
66

सध्या सर्वत्र काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार यावर चर्चा चालू आहे. काँग्रेस हा एक जून राजकीय राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो. काँग्रेसप क्ष म्हटलं की एक नाव आपल्यासमोर लगेचच येतच आणि ते नाव म्हणजे ‘गांधी’. गांधी घराणे आणि काँग्रेस पक्ष हे एक वेगळंच नातं गेले अनेक वर्ष देशच नव्हे तर संपूर्ण जग बघत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आहेत आणि आता काँग्रेसला नव्या अध्यक्षांची गरज आहे. पण यंदा या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील व्यक्ती येणार की नाही हा प्रश्न उभा राहत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दिल्लीमध्ये पार पडणार आहे. पण राहुल गांधी आपली ‘भारत जोडो’ यात्रा अर्ध्यावर सोडून निवडणुकीसाठी दिल्लीला जाणार नाहीत. अशी माहिती समोर आली. या माहितीनंतर सर्वत्र खळबळ उडाली . अनेकदा काँग्रेसने गांधी घराण्याने केलेले काम , त्यांनी कुर्बान केलेले आयुष्य , असे अनेक मुद्दे काढले आहेत. कधी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तर कधी विविध भाषणात पण काँग्रेस आता नेतृत्वहीन झाला आहे असे दिसून येते.

अनेक काँग्रेसमधील नेते अंतर्गत वादामुळे पक्ष सोडून गेले.तर, राहुल गांधी राजीनामा दिल्यावर म्हणाले होते की गांधी कुटुंबाच्या कोणत्याच सदस्याने काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकू नये.

याआधीही झालेली गांधी घराण्याशिवाय निवडणूक :

अनेक वर्षानंतर काँग्रेस अध्यपदाची निवडणूक अशी आहे की ज्यात नेहरू गांधी कुटुंबाचा कोणताच सदस्य सहभागी होणार नाही असे समजत आहे. पण ही काही पहिलीच वेळ नाही जिथे गांधी घराण्याशिवाय निवडणूक होत आहे.

1991 ते 1996 च्या मध्ये गांधी कुटुंबियांमधला कोणताच सदस्य या निवडणुकीत सहभागी नव्हता. मात्र त्यावेळी सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नव्हत्या. राजकारणात आल्यावर 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी सीताराम केसरी यांना हटवून काँग्रेस अध्यक्ष झाल्या होत्या.

2000 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना आवाहन देण्यासाठी समोर जितीन प्रसाद होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना 7542 मतांपैकी फक्त 94 मतं मिळाली होती.

सोनिया गांधी 2017 पर्यंत अध्यक्ष होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी ही जबाबदारी सांभाळली. 2019 नंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष :

1948- 1949: पट्टाभि सीतारमैया
1950- पुरुषोत्तम दास टंडन
1951-1954: जवाहरलाल नेहरू
1955-1959- यूएन ढेबर
1959- इंदिरा गांधी
1960-1963 नीलम संजीव रेड्डी
1964-1965 के कामराज
1968-69 एस निजलिंगप्पा
1970-71- जगजीवन राम
1972-74- शंकर दयाळ शर्मा
1975-77- देवकांत बरुआ
1978-83- इंदिरा गांधी
1985-91- राजीव गांधी
1992-94- पीवी नरसिंह राव
1996-98- सीताराम केसरी
1998-2017- सोनिया गांधी
2017-2019- राहुल गांधी
2019- सोनिया गांधी (अंतरिम अध्यक्ष)

लोकशाहीसाठी निवडणुका होणं हे चांगलं चिन्ह आहे असं वक्तव्य अशोक गेहलोत यांनी पीटीआयशी बोलताना केलं आहे. सचिन पायलट, शशी थरूर , अशोक गेहलोत या सगळ्यांच्या भूमिकांकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागून राहील आहे. तसेच, जर गांधी घराण्यातील व्यक्ती अध्यक्षपदी नसले तर काँग्रेसची पुढची दिशा काय असणार, काँग्रेस कोणती नवी रणनीती आखणार , काँग्रेसला लागलेली गळती थांबणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here