भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार रोहितची दमदार खेळी

0
70

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावांची दमदार खेळी करत विजयाच मोलाचा वाटा उचलला. तसच दिनेश कार्तिक याने दोन चेंडूत 10 धावा करत भारताचा विजय पक्का केला. पावसामुळे 8 षटकांच्या झालेल्या सामन्यातप्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारताने 4 गडी गमावत 7.2 षटकात पूर्ण करत सामना 6 विकेट्सने जिंकला आहे

दरम्यान आऊटफिल्ड ओली असल्यानं हा सामना नियोजित वेळेच्या तब्बल अडीच तास उशीरानं सुरु झाला. सात वाजता सुरु होणारा सामना 9.30 वाजता सुरु झाल्यानं नागपूरकरांना 8-8 ओव्हर्सचाच सामना पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानात आऊटफिल्ड ओली झाली होती. पण मैदान कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे सामना सुरु करण्यात यश आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here