टी20 वर्ल्ड कप आधी क्रिकेटचे ‘हे’ नियम बदलणार, ICC चा मोठा निर्णय

0
46

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेट नियमांमध्ये काही बदल केले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून क्रिकेटमध्ये काही नवीन नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमाने 2022 चा टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे ICC ने बॉलवर थुंक लावण्यावर बंदी घातली होती. आता ही बंदी कायमची लागू झाली आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समितीच्या शिफारशी मंजूर झाल्यानंतर नियम बदलण्यात आले आहेत.

नियम पहिला : ICC च्या नव्या नियमानुसार आता टी-20 सारख्या ODI क्रिकेटमध्ये फलंदाजाला पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार राहावे लागणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये जेव्हा एखादी विकेट पडते तेव्हा फलंदाजाला पहिल्या चेंडूसाठी 90 सेकंदात तयार राहावे लागते. आता वनडे आणि कसोटीमध्ये ही 2 मिनिटांची वेळ असणार आहे. म्हणजे त्या वेळेत जर फलंदाज पहिला चेंडू खेळायला तयार नसेल तर त्याला बाद घोषित केले जाईल.नियम दुसरा : जर एखादा फलंदाज झेलबाद झाला. तर नवीन फलंदाज स्ट्राइकवर येईल. दोन्ही फलंदाजांनी झेल घेण्याआधी क्रीज बदलली असली तरी पुढचा चेंडू नव्या फलंदाजाला खेळावा लागणार आहे.नियम तिसरा : क्षेत्ररक्षणाच्या वेळी खेळाडूने जाणूनबुजून चुकीची हालचाल केल्यास दंड म्हणून फलंदाजाला पाच धावा दिल्या जातील.आधी या चेंडूला डेड बॉल म्हटले जायचे आणि फलंदाजाचा फटका रद्द केला जायचा.

नियम चौथा : जर एखादा चेंडू खेळपट्टीपासून दूर पडला, तर फलंदाजाला आता खेळपट्टीवर थांबावे लागणार आहे. जर फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर गेला तर अंपायर त्याला डेड बॉल देईल. ज्या कोणताही चेंडू फलंदाजाला खेळपट्टी सोडून शॉट खेळण्यास भाग पाडले जाते असेल तर त्याला नो बॉल दिला जाईल. नियम पाचवा : स्लो ओव्हर रेटचा नियम जानेवारी 2022 मध्ये T20 फॉरमॅटमध्ये लागू करण्यात आला होता, ज्यामध्ये स्लो ओव्हर रेटसाठी संघांना दंड आकारण्यात आला होता. आता हा नियम वनडेमध्येही लागू होणार आहे. नियम सहावा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने गेल्या दोन वर्षांपासून बॉलवर थुंक लावण्यावर बंदी घातली होती. आता या नियमावर कायमची बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच आता पुढील नियम बदलेपर्यंत कोणताही गोलंदाज चेंडूवर थुंकू शकणार नाही. बॉल पॉलिश न करण्याचा नियम 2020 मध्ये लागू करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here