रोजा बोन्हेर’ यांची 200 वी जयंती; गूगलकडून खास डूडल

0
213

‘दोन शतकांपूर्वी कला क्षेत्रात महिलांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधी मर्यादित होत्या. पण एक महिलेनं त्यावेळी तिची कला जगासमोर मांडली. ती महिला म्हणजे ‘रोजा बोन्हेर’. रोजा यांचे कुटुंब पेटिंगचे काम करत होते. त्या फार कमी वयात पेन्सिलचा वापर करून पेपरवर पेंटिंग काढायला शिकल्या. बोलायला शिकण्याआधी त्यांनी पेंटिंग काढायला सुरूवात केली.

लँडस्केप आणि पोर्ट्रेट चित्रकार असलेल्या रोजा यांना वडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे बोन्हेर या 19 व्या शतकातील सर्वात नावाजलेल्या महिला चित्रकार झाल्या. रोजा यांनी रेखाटलेल्या घोडे, सिंह आणि इतर काही प्राण्यांच्या चित्रपटांचे अनेकांनी कौतुक केले होते. त्यांनी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहित केलं.

16 मार्च 1822 रोजी फ्रान्समधील बोर्डो येथे जन्मलेल्या बोन्हेरला शाळेत खूप कठीण काळाचा सामना करावा लागला. त्यांना लिखाण आणि वाचन करता येत नव्हते. त्यावेळी त्यांच्या आईनं त्यांना शिकवलं. त्यांच्या 200 व्या जयंती निमित्त गूगलनं खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमध्ये रोजा या काही प्रण्यांचे चित्रपट रेखाटताना दिसत आहेत. रोजा यांची पेटिंग सध्या पॅरिसमधील ऑर्से संग्रहालय ठेवण्यात आलं आहे. एम्प्रेस युजेनी यांच्या हस्ते रोजा यांना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले, हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिला महिला ठरल्या. रोजा यांचे 1899 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here