गानसम्राज्ञी लता दीदींचं पार्थिव प्रभुकुंज येथे दाखल ; दुपारी ३. ३० नंतर सर्वसामान्य चाहत्यांनाही अंत्यदर्शन घेता येणार !

0
230

गानसम्राज्ञी लता दीदींचं पार्थिव ब्रीच कॅंडी रुग्णालयातून निघून प्रभुकुंज येथे दाखल झाले आहे. त्यांचे पार्थिव प्रभुकुंज येथे दुपारी २. ३० वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहे. यानंतर त्यांना तेथे शिवाजी पार्कवर नेण्यात येणार आहे. त्यांच्यावरती संध्याकाळी ६. ३० च्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. पण, शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार न होता शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे माहिती समोर येत आहे.

लता दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४. ३० वाजता पोहोचतील. तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सुद्धा शिवाजी पार्क येथे उपस्थित राहून लता दीदींचे अंत्यदर्शन घेणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, लता दीदींच्या मुंबईतील राहत्या घरी म्हणजेच ‘प्रभुकुंज’वर आता गर्दी वाढत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रभुकुंजकडे रवाना झाले आहेत. तर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रभुकुंज वर जाऊन लता दीदींचे अंत्यदर्शन घेणार आहेत.

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे अगणित चाहते असून त्यांना देखील लतादीदींचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. दुपारी ३. ३० नंतर सर्वसामान्य चाहते हे लता दीदींचे अंत्यदर्शन घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here