दसरा मेळावा : शिंदे गट शिवाजी पार्कसाठी सुप्रीम कोर्टात जाणार

0
71

आज शिवाजी पार्कवरती कोणाचा दसरा मेळावा होणार उद्धव ठाकरे गट की शिंदे गट एकचि सुनावणी होणार होती. अखेर आता सुनावणी झाली असून हायकोर्टाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे, शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गट सुप्रीम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे. शिंदे गट आज संध्याकाळी किंवा उद्या याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहे.

ठाकरे गटाचा ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कुणाला या प्रश्नावरुन हायकोर्टात मोठं घमासान झालं. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट विरुद्ध मुंबई महापालिका असा सामना हायकोर्टात रंगला. कोर्टाने आजच्या अन्य सुनावणी बाजूला ठेवत, दसरा मेळाव्याबाबत सविस्तर सुनावणी घेतली. त्यानंतर तिन्ही बाजूचे दावे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय ठाकरे गटांच्या पारड्यात टाकला. सर्वात आधी हायकोर्टाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर हायकोर्टाने महापालिकेलाही झापलं. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरूपयोग केल्याचं स्पष्ट होतंय, असं हायकोर्ट म्हणालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here