डॉलरचा 20 वर्षांचा उच्चांक : 1 डॉलर पोहोचला 80.79 रुपयांवर

0
56

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची गुरुवारी विक्रमी घसरण झाली. अमेरिकी डॉलरच्या दराने २० वर्षांतील उच्चांक नोंदवला तर रुपयाने नीचांकी पातळी गाठली
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.७५ टक्के वाढ केल्याने रुपयाची ही घसरण झाली. आता एका यूएस डॉलरसाठी ८०.७९ रुपये चुकवावे लागतील. डिसेंबर २०१२ मध्ये एका डॉलरचे मूल्य ५१ रुपये होते. अमेरिकी डॉलरचे मूल्यांकन करणारा डाॅलर निर्देशांक ०.९५% वाढीसह 111.69 वर पोहोचला आहे. त्या तुलनेत युरो २० वर्षांच्या तर पाउंड २९ वर्षांच्या नीचांकावर घसरले आहेत.

अमेरिकी फेड रिझर्व्हने व्याजदरात आणखी वाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळेच डॉलर मजबूत होत असून परिणामी रुपया कमकुवत होतोय. हाच कल पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात ३० सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आहे. त्यानंतर रेपो दर वाढतील अर्थातच देशात व्याजदरातही वाढ होईल, असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे परकीय चलन विश्लेषक गौरांग सोमय्या यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here