दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष – उद्धव ठाकरे

0
72

हायकोर्टानं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये परवानगी दिल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले , शिवसैनिक, शिवसेनाप्रेमींनी उत्साहात दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर येण्याच आव्हान करतो. वाजत गाजत गुलाल उधळत या.. पण शिस्तीनं या.. आपल्या तेजस्वी परंपरेला, तेज्याचा वारस्याला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका…

इतर काय करतील, त्यांचा आपल्याला माहित नाही. पण आपली परंपरा आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचं प्रतिनिधित्व करत आहोत. या दसऱ्या मेळाव्याकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आणि जगात राहणाऱ्या बांधवांचं लक्ष लागले आहे. आजच्या निकालाकडेही त्यांचं लक्ष लागलं होतं. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, उत्साहात या, वाजत गाजत या.. पण शिस्तीनं या…

दोन गट नाही, शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती वाढली आहे. परवचा मेळावा हा मुंबईतल्या गटप्रमुखांचा होता. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टाने राज्य सरकारला बजावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था राखावी. प्रत्येकवेळी वाईटाचा विचार करु नये. चांगली सुरुवात झाली आहे. विजया दशमीचा मेळावा… पहिला मेळावाही मला आठवतोय… आजोबांचं भाषण आजही माझ्याकडे आहे.. कोरोनाचा काळ गेला तर ही परंपरा कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here