कौतुकास्पद : भाजप आयोजित “मुंबईचा मोरया” स्पर्धेत गोरेगावच्या “शरद् मित्र मंडळाला ” सर्वोत्कृष्ट मुर्ती ” (द्वितीय क्रमांक) पुरस्कार जाहीर

0
85

राज्यात कोरोनाच्या संकटानंतर यंदा निर्बंध हटविल्यामुळे जोशात , आनंदात गणेशोत्सव साजरा झाला. अनेक सार्वजनिक मंडळांनी विविध देखावे , सांस्कृतिक , सामाजिक उपक्रम राबविले होते. अशातच, भारतीय जनता पार्टीने मुंबईत मुंबई गणेश उत्सव स्पर्धा २०२२ “मुंबईचा मोरया” अशी स्पर्धा आयोजित केली होती. यात, गोरेगावच्या शरद् मित्र मंडळ म्हणेच “उपनगरचा मोरया” या मंडळाला “सर्वोत्कृष्ट मुर्ती ” (द्वितीय क्रमांक) पुरस्कार जाहीर झाला.

भारतीय जनता पार्टी (मुंबई) आयोजित मुंबई गणेश उत्सव स्पर्धा २०२२ “मुंबईचा मोरया” या स्पर्धेत “उपनगरचा मोरया” “शरद् मित्र मंडळाला ” सर्वोत्कृष्ट मुर्ती ” (द्वितीय क्रमांक) पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार, यांच्या उपस्थितीत मंडळाला पुरस्कार प्रदान करण्यातआला, दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here