बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची पार पडली बैठक ; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

0
320

दादरमधील राजे शिवाजी विद्या संकुल ,नाबर गुरुजी हॉल येथे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत यंदा पार पडलेला गणेशोत्सव, उत्सवादरम्यान जाणवलेल्या समस्या , पीओपीच्या गणेशमूर्ती , गणेशोत्सव मंडळांनी राबविलेले कार्यक्रम इत्यादी विषयांवर चर्चा झाली. विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची या बैठकीला उपस्थिती होती . तसेच, प्रमुख अतिथी म्हणून गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर , कार्याध्यक्ष कुंदन आगसकर , प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर , समन्वय समितीचे उपाध्यक्ष सतीश नायक आदी उपस्थित होते.

यावेळी, ध्वनिक्षेपकासंदर्भात न्यायालयाच्या आदेशाची माहिती देऊन, कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव कसा साजरा करायचा हे सांगण्यात आले. पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत समन्वय समितीकडून काय पावले उचलण्यात आली हे सांगण्यात आले तसेच, मूर्तिकारांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रशासनाला एक समिती गठीत करण्यासाठी सांगण्यात आले अशी माहिती मंडळांना देण्यात आली. याचवेळी, समन्वय समितीच्या वतीने कोरोना काळात मंडळाच्या वतीने भरविण्यात आलेली रक्तदान शिबिरे , आरोग्य शिबिरे , जंतुनाशक फवारणी तसेच, मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधी व प्रधानमंत्री सहायता निधी यांना केलेली मदत याचा उल्लेख करत कौतुक करण्यात आले.

तसेच, कृत्रिम तलावांबाबतच्या त्रुटी महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान , समन्वय समितीने आत्तापर्यंत केलेली कामे अमित कोकाटे यांनी मांडली . या बैठकीला समितीचे उपाध्यक्ष निखिल गुडेकर , पुरुषोत्तम वर्तक , सुरज वालावलकर , निखिल गावंड , प्रदीप पांडे , गणेश गुप्ता, भूषण मडव , संतोष सावंत , सुधाकर पडवळ , बाळा लाड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here