आताची मोठी बातमी समोर येत आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर बायोमधून ‘पर्यावरणमंत्री’ काढून टाकले आहे. राज्यात नाराजीनाट्य सुरु आहे . शिवसेनेचे कट्टर म्ह्णून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. अशातच, अनेक घडामोडी घडत असताना आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर बायोमधून ‘पर्यावरणमंत्री’ काढून टाकले आहे.
काल महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी त्यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या ट्विटर हँडल बायोवरून “शिवसेना” काढून टाकले. शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. एका ट्विटमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही