शेअर बाजारात मोठी घसरण ; सेन्सेक्स 1200 अंकांनी आपटला

0
64

आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. एसजीएक्स निफ्टीत 300 अंकांची घसरण झाली. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात शेवटच्या काही तासांत मोठी घसरण झाली होती. महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर बाजार बंद होण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासात अमेरिकन शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. त्यामुळे अमेरिकेत मोठी घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची दाट शक्यता होती.

सेन्सेक्समध्ये प्री-ओपनिंग सत्रात 1200 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीमध्ये 370 अंकांची घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1069 अंकांच्या घसरणीसह 57,753.61 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 314 अंकांच्या घसरणीसह 17,244.45 अंकांवर व्यवहार करत होता.

निफ्टीतील स्मॉलकॅप 100, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात दोन टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टी आयटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, रियल्टी या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. आयटी निर्देशांकात 4.20 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, पीएसयू बँक निर्देशांकात 2.51 टक्के णि मेटलमध्ये 2.44 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. बँक निफ्टीतही दोन टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टी निर्देशांकातील सर्व 50 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 30 शेअर दरात घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीत 823 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 38154 अंकांवर व्यवहार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here