भारत – पाक सामन्यानंतर अजूनही इंग्लंडमध्ये तणावपूर्ण वातावरण

0
71

आशिया कप 2022 मधील पहिल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर पूर्व लंडनमधील लीसेस्टर शहरात दोन समुदायांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी एका विरोध प्रदर्शनापासून याच्यात आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, लीसेस्टर शहर पोलिसांनी अराजकता न पसरवता शांत राहण्याचे आवाहन केले आहे. शहराचे मुख्य कॉन्स्टेबल रॉब निक्सन यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात ते ‘आपल्या शहरात पूर्व लीसेस्टरमध्ये काही ठिकाणी अराजकता पसरवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तेथे पाठवले असून स्थिती नियंत्रणात आहे. अतिरिक्त अधिकारी देखील तेथे पोहचत आहेत. कृपया अशा प्रकारच्या कायदा आणि सुव्यस्था बिघडवणाऱ्या घटनांमध्ये सामील होऊ नका’ असे शांततेचे आवाहन करत आहेत

दरम्यान, पूर्व लीसेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक अधिकारी पोहचले असून ते परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पोलिसांना मोठ्या प्रमाणावर लोकांना थांबवून त्यांची तपासणी करणे सुरू केले आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. यातील एकावर कायदा व सुव्यवस्था बिघडवून हिंसा पसरवण्यासाठी कट केल्याचा आरोप ठोवण्यात आला आहे. दुसऱ्या व्यक्तीला ब्लेडसारखी वस्तू स्वतःजवळ ठेवल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे.लीसेस्टर पोलीस आपल्या वक्तव्यात म्हणते की, ‘पोलिसांकडे हिंसा आणि तोडफोडीच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. याची सध्या चौकशी सुरू आहे. आम्हाला लीसेस्टरच्या मेल्टन रोडवर एका धार्मिक इमारतीबाहेर एक व्यक्ती झेंडा खाली खेचत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मिळाली आहे.

ज्यावेळी पोलीस अधिकारी भागात अराजक कारवाया रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली. घडलेल्या घटनेची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी ‘आम्ही स्थानिक समुदायांच्या नेत्यांना घेऊन संवाद आणि शांतीचे आवाहन करत आहोत. आम्ही आमच्या शहरात हिंसा करणे आणि कायदा सुव्यवस्था भंग करणे हे आम्ही खपवून घेणार नाही.’ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 28 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यानंतर स्थानिक हिंदू आणि मुस्लिम समुदायांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिन्याच्या सुरूवातीला देखील पोलीसांनी अशाच प्रकारचे आदेश दिले होते. शुक्रवारी मुख्य कॉन्स्टेबल निक्सन यांनी सांगितले की, पूर्व लीसेस्टर भागात पोलिसांनी चालवलेल्या अभिनयानात आतापर्यंत एकूण 27 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here