सर्वपित्री अमावास्येला बनत आहे चार ग्रहांचा अद्भुत संयोग; ‘या’ राशींच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

0
62

ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या ग्रहाच्या राशी संक्रमणाचा किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी होणाऱ्या संयोगाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. यंदा सर्वपित्री अमावस्या २५ सप्टेंबर रोजी आहे. त्याच वेळी या दिवशी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तसेच, या दिवशी कन्या राशीमध्ये चार ग्रहांचा विशेष संयोग तयार होत आहे. या संयोगामध्ये बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगदेखील समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत तीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

मेषसर्वपित्री अमावस्या तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. तुम्हाला पूर्वज आणि ग्रहांचे भरपूर आशीर्वाद मिळतील. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. करिअरमध्ये आणि व्यवसायात जी काही आव्हाने येत असतील, ती तुम्ही पार करून यशाची शिखरे गाठाल. व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. दुसरीकडे, तुमच्या संक्रमण कुंडलीच्या नवव्या घरात बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग तयार होतील. त्यामुळे तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. यासोबतच रखडलेली सर्व कामे मार्गी लावली जातील.

वृषभबुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग तुमच्या संक्रमण कुंडलीत पाचव्या घरात तयार होणार आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी शुक्राचा संयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. कला क्षेत्राशी निगडित असलेल्यांसाठी हा काळ खूप छान असणार आहे. दुसरीकडे, प्रेम संबंधांमध्ये तुम्हाला यश मिळेल.

सिंहबुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण तुमच्या संक्रमण कुंडलीत दुसऱ्या घरात तयार होत आहेत. दुसरीकडे, सर्वपित्री अमावस्येला कन्या राशीतील चार ग्रहांचा संयोग सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. तुमच्यासाठी अचानक आर्थिक लाभाचे योग बनतील. तसेच गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच, ज्या लोकांचे करिअर भाषण क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ उत्कृष्ट सिद्ध होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here